नगरपालिका, रेल्वे आणि जिल्हाधिकारी कार्यालयांकडे नागरिकांनी मांडलेले प्रश्न आम्ही नोंदवतो, पाठपुरावा करतो आणि प्रत्येक अर्जाची नोंद ठेवतो — सोडवणूक होईपर्यंत.
प्रत्येक आकडा सार्वजनिक नोंदीचा आहे · दर रविवार अद्ययावत
नागरिक संपर्क करतो किंवा सार्वजनिक फॉर्म भरतो. आम्ही कागदपत्रे, छायाचित्रे आणि स्थळ नोंदवतो.
योग्य कार्यालयाला पत्र, RTI किंवा प्रत्यक्ष भेट. प्रत्येक भेटीची तारीख, अधिकारी आणि निष्कर्ष नोंदवला जातो.
ब्लॉगद्वारे प्रकरण लोकांसमोर मांडले जाते. कार्यालयाला उत्तराची संधी दिली जाते. सोडवणूक झाल्यावर खटला बंद.
आयुक्त आणि महावितरणकडे तक्रार, SIT चौकशी आणि अकरा आरोपींवर दोषारोपपत्र — बिल गैरव्यवहाराचा कागदोपत्री माग.
पुणे–मिरज दुहेरीकरणावर १५,००० कोटी, तरीही दिवसाला फक्त पंधरा गाड्या. आम्ही पंतप्रधान कार्यालय व रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिले.
सांगली स्थानक स्वच्छतेत राज्यात अव्वल ठरले तेव्हा त्याचे श्रेय शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांचे होते.
एक SMS, एक छायाचित्र, एक तपशील पुरेसा आहे. आम्ही पाठपुरावा करू.