सर्व वार्ता
Railwayप्रकाशित · १३ मे, २०२६
वंदे भारत मिरजला का वगळली — आणि १५,००० कोटींनी काय मिळाले?
पुणे–मिरज दुहेरीकरणावर १५,००० कोटी, तरीही दिवसाला फक्त पंधरा गाड्या. आम्ही पंतप्रधान कार्यालय व रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिले.

पुणे–मिरज मार्गाच्या दुहेरीकरणावर १५,००० कोटी खर्च झाले. तरीही दिवसाला जेमतेम पंधरा गाड्या धावतात. बेंगळुरू–मुंबई वंदे भारत मिरजपासून वळवली गेली, तेव्हा आम्ही रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिले व पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार नोंदवली.
हा प्रश्न एका गाडीचा नाही. ज्यांच्या पैशातून गुंतवणूक झाली त्या जनतेला तिचा लाभ मिळतो का — आणि नकाशा आखताना या मार्गावरील शहरे मोजली जातात का — हा प्रश्न आहे.